विविध योग शिबीर

 

दरवर्षी मे महिन्यात उन्हाळी सुट्या असल्यामुळे योग शिक्षकांसाठी दहा दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात येते . सरकारी कार्यालयात ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी रिफ्रेश कोर्स असतात तद्वतच ही योग शिक्षकांसाठीची विशेष कार्यशाळा असते यामध्ये शिक्षकांकडून योगसाधक म्हणून शिकवण्याचे कौशल्य याबाबत विशेष मार्गदर्शन देण्यात येते या शिबिरांसाठी उपस्थिती खूप चांगली असते . व सर्वजण पुढील वर्षासाठी लागणारी ऊर्जा या शिबीराद्वारे घेऊन जातात असा आमचा अनुभव आहे .
निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे वर्षभरात ‍ दर महिन्यात कमीत कमी एक तरी योग शिबिर आयोजित केल्या जाते . यामध्ये उच्च रक्तदाब मधुमेह मणक्यांचे विकार योग परिचय इत्यादी सोबत ऋतू बदलांमुळे होणाऱ्या पचन संस्था तसेच श्वसनसंस्था इत्यादींच्या विकारांवरील उपक्रम योगाभ्यासाची शिबिरे आयोजित करण्यात येतात.

ही सर्व शिबिरे सात ते दहा दिवसांची असतात यामध्ये योग अभ्यासासोबतच तात्त्विक विवेचना द्वारे साधकांचे प्रबोधन करून त्यांची योगसाधने बाबतची वैचारिक बैठक ही पक्की व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात.

याशिवाय वजन कमी करण्यासाठी उपयुक्त योगाभ्यास या अंतर्गत तीन आठवड्यांचे विशेष योग शिबीर घेऊन नंतर सतत त्यांचा पाठपुरावा केल्या जातो. या शिबिरात योगसाधकांना दिनचर्या ऋतुचर्या तसेच आहार-विहार याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

[envira-gallery id=”638″]